Pune News l पुण्यातील कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने पुण्यातील तब्बल दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी विखे पाटलांवर केले धक्कादायक आरोप :
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने पुण्यातील तब्बल दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या आरोपावर महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या सचिन शिंदे आणि श्वेता आचार्य यांनी शासनाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
Pune News l या प्रकरणाची चौकशी व्हावी :
पुण्यातील कासारसाई धरणातील प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेली आणि जिल्हाधिकारी यांच्या नावावर असलेल्या जमिनीचं श्वेता आचार्य आणि सचिन शिंदे यांनी बेकायदेशीरपणे साठे खत आणि पावर ऑफ ॲटर्नी केली आहे. मात्र हीच जमीन नियम मोडून वाटप करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतल्याचं आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
याशिवाय मावळ तालुक्यातील चांदखेड गावात तब्बल 31 एकर जमीन आहे. मात्र ती जमीन देखील हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील करण्यात यावी असं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
News Title – Ravindra Dhangekar on Radhakrishna Vikhe
महत्त्वाच्या बातम्या-
दसऱ्याच्या मुहूर्तालाच सोनं महागलं, जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर!
दसऱ्यावर पावसाचं सावट, आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार!
महिलांना पार्ट टाइम जॉब, 11 हजार पगार देणार; महायुती सरकारची मोठी घोषणा
दसऱ्याला ‘या’ राशींवर होणार धन-सुखाची बरसात, मिळणार अमाप पैसा!
लाडक्या बहीण योजनेत मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज






