‘काँग्रेस नक्की जिंकेल’; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

On: December 8, 2022 12:31 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे गुजरातचा बालेकिल्ला कायम टिकून राहणार असल्याचं दिसून येत आहे.

हिमाचल प्रदेशचा एक्झिट पोल जारी करण्यात आला. हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या (Congress) निकालात चढउतार होत असल्याचं दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे जास्त जागा जाणार असल्याचं आणि काँग्रेस विजयी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राऊत राहुल गांधींना पांठिबा दिल्याचं पहायला मिळालं आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. यावर बोलताना राऊतांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टिका केली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये ज्यापद्धतीने काँग्रेस लढत आहे ते कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन. हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकेल. देशातील पुढील येणाऱ्या निकांलासाठी हे चित्र आशादायक आहे. विरोधकांनी एकत्र येणं गरजेच आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या, असं ते म्हणालेत.

भाजपला (BJP) संघर्ष करावा लागत आहे. दिल्ली हातातून गेलं आहे आणि हिमाचलमध्ये भाजपला आता संघर्ष करावा लागत असल्याचं पहायला मिळत आहे. हेवेदावे विसरुन सगळे विरोधक एकत्र आले तर गुजरातमध्ये परिवर्तन होऊ शकतं असं राऊत म्हणाले.

सगळे विरोधक एकत्र आले आणि लढले तर 2024 मध्ये वेगळं असेल, असं देखील ते म्हणाले. यावेळी बोलताना भाजप नेत्यांवर टिका करत भाजप नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now