रतन टाटांचं बॉलिवूडशी खास नातं; मात्र झाले ‘इतक्या’ करोडोंचे नुकसान

On: October 10, 2024 11:49 AM
Ratan Tata Produced Movie
---Advertisement---

Ratan Tata Produced Movie l उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनावर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे. रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांचे बॉलिवूडशी खास नाते आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र, या चित्रपटानंतर त्यांनी बॉलिवूडमधून माघार घेतली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही चित्रपटात पैसे गुंतवले नाहीत.

अमिताभ बच्चनने साकारली ही भूमिका :

रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला होता. त्यावेळी रतन टाटा यांचे करोडोंचे नुकसान झाले. मात्र त्यानंतर त्यांनी कोणत्याही चित्रपटात पैसे गुंतवले नाहीत. अमिताभ बच्चन यांचा ऐतबार २००४ साली आला होता. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी एका संरक्षक वडिलांची भूमिका साकारली होती.

हा चित्रपट फिअर या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे. ऐतबारमध्ये बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे एका वडिलांच्या भूमिकेत होते. जो आपल्या मुलीला तिच्या विक्षिप्त आणि धोकादायक प्रियकरापासून वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जात आहे.

Ratan Tata Produced Movie l रतन टाटांचे मोठे नुकसान झाले होते :

रतन टाटा यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटात लोकांना अमिताभ, बिपाशा आणि जॉनचा अभिनय खूप आवडला. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. या चित्रपटाचे बजेट 9.50 कोटी होते आणि केवळ 7.96 कोटी रुपये कमावले. तसेच त्या चित्रपटाला त्याची किंमतही वसूल करता आली नाही. या चित्रपटामुळे रतन टाटा यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर ते इंडस्ट्रीपासून दुरावले.

News Title : Ratan Tata Produced Movie

महत्वाच्या बातम्या –

‘या’ महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता जमा!

..म्हणून रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही; वाचा त्यांची LOVE Story

रतन टाटा यांची एकूण संपत्ती किती?, उत्पन्नातील मोठा हिस्सा दानमध्येच दिला

सर रतन टाटा यांचे 10 प्रेरणादायी विचार, एकदा वाचाच!

..आता रतन टाटांच्या टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण असणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now