Ratan Tata Passed Away | देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं काल 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत निधन झालं. रतन टाटा यांच्या मालकीचा टाटा समूह हा तब्बल 3800 कोटी रुपयांचा आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असणार?, याबाबत चर्चा रंगत आहे. (Ratan Tata Passed Away)
टाटा समूहाने फक्त उद्योग, व्यवसाय केला नाही, तर सामाजिक बांधिलकी देखील जपली. रतन टाटा यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे, दानधर्मामुळे त्यांचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यावर भारतीयांचं प्रचंड प्रेम आहे. रतन टाटा यांची संपत्ती देखील प्रचंड मोठी आहे. मात्र, त्यांनी लग्न केलं नसल्याने आता त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण असणार, यबाबत बोललं जातंय.
टाटा समूहाची 3800 कोटी रुपयांची संपत्ती
रतन टाटा यांच्या मालकीचा टाटा समूह हा तब्बल 3800 कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्या या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये नोएल टाटा यांचं नाव सध्या पुढे येत आहे. नोएल टाटा हे नवल टाटा आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे पुत्र आहेत. तसेच ते रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल टाटा यांना तीन मुलं आहेत. त्या तीनही मुलांना टाटा समूहाचे आगामी उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातंय. यामध्ये माया टाटा, नेविल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे. (Ratan Tata Passed Away)
राज्यात शासकीय दुखवटा जाहीर
माया टाटा या 34 वर्षांच्या असून त्यांनी बेयज बिझनेस स्कूल आणि यूनिवर्सिटी ऑफ वॉरविक येथून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी टाटा अपॉर्चुनिटीज फंड आणि टाटा डिजीटलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. टाटा न्यू एपला लाँच करण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. तर, नेविल टाटा हे 32 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या किर्लोस्कर कुटुंबातील मानसी किर्लोस्कर यांच्या सोबत झालं आहे. तर, लिया टाटा या 39 वर्षांच्या आहेत. लिया टाटा सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी टाटा समूहात हॉस्पिटिलिटी सेक्टरमध्ये मोठं काम केलं आहे. तसेच त्यांनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेसमध्ये मोठं योगदान दिलं आहे.
दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. (Ratan Tata Passed Away)
News Title : Ratan Tata Passed Away who will future leader of tata group
महत्वाच्या बातम्या –
भारताचा अनमोल ‘रतन’ हरपला! टाटा यांची कारकीर्द पाहून सलाम ठोकाल
भारताचा कोहिनूर हरपला!रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर
जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक!
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तब्बल ‘इतके’ वर्ष मोफत धान्य मिळणार






