Rashmika Mandanna ने दिली गुड न्यूज, ‘या’ अभिनेत्यासोबत थाटणार संसार

On: January 8, 2024 5:01 PM
rashmika mandanna
---Advertisement---

Rashmika Mandanna | नॅशनल क्रश म्हणून कायम चर्चेत असणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रश्मिकाच्या अॅनिमल चित्रपाटतील भूमीकेमुळे तिची फॅन फोलोइंग दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सोशल मीडियावर रश्मिका आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

रश्मिका थाटणार संसार?

रश्मिका (Rashmika Mandanna) कायम तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र सध्या ती तिच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना तिच्या लग्नाबदल जाणून घ्यायचं होतं. शिवाय रश्मिका कोणासोबत संसार थाटणार याबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत.

रश्मिकासोबत ज्या अभिनेत्याचं नाव जोडलं जात आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विजय देवरकोंडा आहे. अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्याबदल चर्चा सुरु होत्या. या दोघांनी एकत्रीत अनेक चित्रपटात स्क्रिन शेअर केली आहे.

व्हिडीओ व्हायरल-

रश्मिका मंदानाचा फोटो एका यूजरने त्याच्या X अकाउंटवर शेअर केलं. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. युजरने रश्मिका हिचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं “तू आमच्यासाठी नॅशनल क्रश आहेस. तुझ्यासारखी पत्नी मला देखील भेटेल, अशी अपेक्षा आहे”.

रश्मिकाने दिली प्रतिक्रिया-

रश्मिकाने नेटकऱ्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हणाली, “जेव्हा मी लग्न करेन, तेव्हा मला आशा आहे की माझा पती देखील माझ्याबद्दल एक अद्भुत पत्नी म्हणून विचार करेल”. सध्या सर्वत्र रश्मिका हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

“अॅनिमल” चित्रपटाच्या प्रमोशन वेळी अभिनेता रणबीर कपूरने देखील रश्मिका – विजय यांच्या नात्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या होत्या. चर्चा सुरु असल्या तरी मात्र यावर दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

News Title : rashmika mandanna marriage latest news

महत्त्वाच्या बातम्या-

Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!

Pune News | शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती उघडकीस!

Aishawarya Rai आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत मोठी बातमी समोर!

Ajit Pawar | सुप्रिया सुळेंकडून भावाचं कौतुक, अजित पवार म्हणाले ‘असली नौटंकी आवडत नाही’

Malaika Arora | मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप?; अखेर खुलासा झाला

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now