Rashmika Mandanna | ‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रचलित असणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हीच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.तिने काल 9 सप्टेंबररोजी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करत अपघात झाल्याची माहिती दिली होती. अशात तिने आपल्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे. (Rashmika Mandanna)
रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “हॅलो मित्रांनो, कसे आहात? मला माहित आहे की मी बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर नव्हती. आता बराच वेळ गेला आहे. मी गेल्या महिन्यात फार सक्रिय नव्हती. माझा एक छोटासा अपघात झाल्याने मी सक्रीय नव्हती. सध्या मी बरी असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.”, असं रश्मिकाने म्हटलं आहे.
रश्मिका मंदानाचा अपघात
पुढे अभिनेत्रीने म्हटलं की, “डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार, मी घरीच होते. आता प्रकृतीत सुधारणा होत असून मी सुपर अॅक्टिव्ह होण्याच्या टप्प्यात आहे. मला आता तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. आयुष्य हे खूप लहान आणि नाजूक आहे. उद्या काय होईल, याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या, आणि हो मी सध्या खूप मोदक खात आहे.”, असंही रश्मिका (Rashmika Mandanna) म्हणाली.
या पोस्टनंतर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रश्मिकाच्या चाहत्यांनी तिला काळजी घे, असं आवाहन केलं आहे. रश्मिकाचा अपघात झाल्याचे कळताच सोशल मीडियावर चिंता व्यक्त करण्यात आली. पण, आता अभिनेत्री एकदम ठीक असून तिने याबाबत स्वतः पोस्ट करत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
रश्मिका मंदानाचे आगामी चित्रपट
रश्मिकाने ‘अॅनिमल’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री केली. यात ती अभिनेता रणबीर कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसून आली. या चित्रपटात तिची आणि रणबीरची केमिस्ट्री चांगलीच हीट ठरली. आता ती साऊथ स्टार अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती (Rashmika Mandanna) सलमान खानसोबत ‘सिकंदर’ आणि विकी कौशलच्या ‘छावा’मध्येही दिसणार आहे.
News Title : Rashmika Mandanna Health Update
महत्वाच्या बातम्या-
व्यापरातील अडचणी तर विवाहातील अडथळे, ‘या’ राशीची सर्व संकटे होतील दुर
शरद पवार गटाचा बारामतीचा उमेदवार ठरला, युगेंद्र पवार यांनाच मिळणार तिकीट?
“देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत; त्यांना रोमान्स कळत नाही, त्यांना फक्त…
सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली; धनंजय मुंडेंची खंत अखेर ओठावर
आयफोनप्रेमींनो… जाणून घ्या iPhone 16 सिरिजची किंमत काय असणार?






