रामायण चित्रपटाच्या इव्हेंटची तारीख ठरली! रणबीर कपूरची पहिली झलक ‘या’ दिवशी दिसणार

On: February 3, 2026 6:23 PM
Ramayan Movie
---Advertisement---

Ramayan Movie | रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रामायण’ (Ramayan) प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही पात्राचा अधिकृत लूक जाहीर करण्यात आलेला नव्हता, मात्र आता निर्मात्यांनी चाहत्यांची प्रतीक्षा संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात प्रमुख कलाकारांचे फर्स्ट लूक समोर येणार असल्याची माहिती मिळत आहे.

भव्य कार्यक्रमात उघड होणार रामाचा अवतार :

मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण’च्या टीमकडून मार्चमध्ये पहिला अधिकृत ग्रँड इव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत कसा दिसणार आहे, याचा पहिला अधिकृत लूक जाहीर केला जाणार आहे. सुरुवातीला रणबीर कपूरने ही भूमिका करावी की नाही, यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि वाद झाले होते. मात्र चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर, त्यामध्ये दिसलेल्या रणबीरच्या झलकमुळे अनेक प्रेक्षकांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता.

या चित्रपटात रामाची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरच्या अभिनयाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आणि निर्माता नमित मल्होत्रा (Namit Malhotra) यांच्या नेतृत्वाखाली तयार होणारा हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक अपेक्षित प्रोजेक्ट्सपैकी एक मानला जात आहे. या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचीही चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे.

Ramayan Movie | गेटवे ऑफ इंडियावर ऐतिहासिक सोहळा :

हा ग्रँड इव्हेंट मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे आयोजित केला जाणार आहे. तसेच हा कार्यक्रम राम नवमीच्या दिवशी, म्हणजेच 27 मार्च रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे, त्यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमाला चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रणबीर कपूर व्यतिरिक्त साई पल्लवी (Sai Pallavi), रवि दुबे (Ravi Dubey) आणि यश (Yash) यांचाही सहभाग अपेक्षित आहे. ‘रामायण पार्ट 1’ हा चित्रपट यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा वाल्मीकींच्या रामायणावर आधारित असून, यश रावणाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल (Sunny Deol) हनुमानाच्या भूमिकेत आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

News Title: Ranbir Kapoor Ram Look Reveal

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now