अजित पवारांना गुलीगत धोका; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार

On: October 8, 2024 5:09 PM
Ajit Pawar Plane Crash
---Advertisement---

Ajit Pawar l राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे बडे नेते महाविकास आघाडीकडे जाण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडे जाणाऱ्यांचा कल देखील वाढल्याचं दिसून येत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचं लक्षात येताच अनेक इच्छुक नेत्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा बसणार आहे.

अजित पवारांना पुन्हा धक्का :

हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता रामराजेंचं देखील ठरलं आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्यांची उमेदवारी जाहीर केली होती ते दीपक चव्हाण हे देखील शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी उमेवारी जाहीर केलेल्या विद्यमान आमदाराने देखील अजित पवार यांना गुलीगत धोका दिल्याचं दिसून येतं आहे.

सर्वात विशेष बाब म्हणजे इंदापूर येथील कार्यक्रमातून शरद पवारांनी फलटणमधील 14 तारखेच्या मेळाव्याची माहिती देत रामराजे निंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशाचे संकेत देखील दिले होते. मात्र, त्यानंतर देखील रामराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीत काय ठरतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र आता रामराजेंच देखील तुतारी हाती घेण्याचा निर्णय झाला आहे.

Ajit Pawar l या दिवशी होणार पक्ष प्रवेश :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत सातारा येथील अजित पवार गटाचे सातारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच अजित पवार यांच्यासोबत असलेले फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे राजकीय बडे नेते देखील तुतारी हातात घेणार आहेत.

येत्या 14 ऑक्टोबरला फलटणमध्ये जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात पार पडणार आहे. या मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे.

News Title – Ramraje Naik Nimbalkar Go to Sharad pawar group

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात खळबळ! ‘या’ माजी आमदारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्यात आचारसंहिता कधी लागणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, सर्व दौरे रद्द

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

“हरियाणात भाजपचा प्रशासनावर दबाव, खरी आकडेवारी..”; कॉँग्रेसचा गंभीर आरोप

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now