रामदेव बाबांना हायकोर्टाचा दणका! ‘त्या’ प्रकरणी पतंजली आयुर्वेदला मोठा दंड

On: July 30, 2024 11:26 AM
Ramdev Baba patanjali ayurved fined 4 crore 
---Advertisement---

Ramdev Baba | मुंबई उच्च न्यायालयाने योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टाने तब्बल 4 कोटींचा दंड ठोठावला आहे. मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजलीच्या (Ramdev Baba ) कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.

न्यायालयाने 2023 मध्ये याबाबत आदेश दिला होता. मात्र, या आदेशाचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाने ही कारवाई केली आहे. सुनावणी दरम्यान पतंजलीने न्यायालयाची बिनशर्त माफी देखील मागितली आहे.

पतंजलीला 4 कोटींचा दंड

“पतंजली एक श्रीमंत कंपनी असून आदेश दिल्यानंतर पतंजली फक्त उत्पादनाची विक्री करत नव्हती, तर त्यांचं उत्पादन सुद्धा सुरु होतं.”, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती आर.आय. छागला यांच्या एकल खंडपीठाने पतंजलीने जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे म्हणत 4 कोटींचा दंड ठोठावला (Ramdev Baba ) आहे.

तसेच ही रक्कम दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला देखील न्यायालयाने पतंजलीला 50 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. असा एकूण दंड हा 4.50 कोटी रुपयांचा ठोठावण्यात आला.

बाबा रामदेव यांनी ‘तो’ दावा मागे घेण्याचे न्यायालयाचे निर्देश

न्यायालयाच्या बंदीनंतरही कापूर उत्पादने विकल्याबद्दल पतंजलीवर ही कारवाई करण्यात आली. मंगलम ऑरगॅनिक्सने याबाबत अर्ज दाखल करत पतंजली अंतरिम आदेशाचे उल्लंघन करून कापूर उत्पादने विकत असल्याचा आरोप केला होता. यावर निकाल देत न्यायलयाने हा दंड दिला आहे.

पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही देशातील मोठी कंपनी असून ती बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी स्थापन केली होती. न्यायालयाने यांना देखील धक्का दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव (Ramdev Baba ) आणि आचार्य बाळकृष्ण यांना सोशल मीडियावरील दावा मागे घेण्यास सांगितले आहे. यामध्ये ‘कोरोनिल’ हा कोरोनावरील उपाय म्हणून प्रचार करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना 15 दिवसांच्या आत हा दावा मागे घेण्यास सांगितलं आहे.

News Title –  Ramdev Baba patanjali ayurved fined 4 crore 

महत्त्वाच्या बातम्या-

“एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून…”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

अश्लीलतेचा कळस! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली चक्क प्रग्नेन्सी टेस्ट, Video व्हायरल

“पुणे बरबाद व्हायला..”; राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप

मोठी बातमी! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तातडीने पार पडली शस्त्रक्रिया; नेमकं झालं काय?

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Join WhatsApp Group

Join Now