“रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?”, अनिल परबांचा हल्लाबोल

On: October 4, 2025 5:58 PM
Anil Parab Vs Ramdas Kadam
---Advertisement---

Anil Parab VS Ramdas Kadam | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणाऱ्या रामदास कदम (शिंदे गट) यांच्यावर अनिल परब (ठाकरे गट) यांनी जोरदार पलटवार केला आहे. रामदास कदम यांच्या पत्नीच्या १९९३ मधील मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अनिल परब यांनी मागणी केली आहे. रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?, याची चौकशी करावी, अशी मागणी अनिल परब यांनी शनिवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. (Ramdas Kadam Wife)

रामदास कदम यांची नार्को टेस्ट करा :

१९९३ साली रामदास कदम यांच्या बायकोने ज्योती कदम यांनी स्वत:ला जाळून घेतले. मात्र, तिने स्वत:ला जाळून घेतले होते की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदम (Ramdas Kadam) यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरुन काय राजकारण झाले, हे सगळ्यांना माहिती आहे.

रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणे शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असे आव्हान अनिल परब यांनी दिले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Anil Parab)

Anil Parab VS Ramdas Kadam | बाळासाहेबांच्या मृत्यूच्या दाव्यावर जोरदार टीका:

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणारे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या अनिल परब यांची जोरदार हल्ला चढवला आहे. रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत केलेले दावे १०० टक्के खोटे असल्याचे अनिल परब म्हणाले.

बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर कुणीही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवू शकतो का? कोणतीही इंजेक्शन दिली तरी हे शक्य नाही. ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. परब यांनी विचारले की, बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर कदम मंत्री झाले, त्यांना उद्धव ठाकरेंनीच मंत्री केले. मग गेली १२ वर्षे कदम यांचे तोंड बंद का होते आणि आता १४-१५ वर्षांनी कंठ का फुटला? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला.

पुतण्याने आत्महत्या का केली? :

अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर अन्य गंभीर आरोप करत, त्यांच्याकडे १०० गुन्ह्यांचे पुरावे असल्याचा दावा केला. कदम यांनी लोकांच्या जमिनी खाल्ल्या, डान्सबार चालवले, ते वाळूचोर आहेत, दादागिरी करतात आणि जमिनी लाटल्या आहेत.

कदम यांच्या पुतण्याने आत्महत्या का केली? याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी परब यांनी केली. मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे) रामदास कदम यांना का वाचवले, अशी कोणती मजबुरी आहे, असा प्रश्नही परब यांनी विचारला.

News title : Anil Parab Vs Ramdas Kadam

Join WhatsApp Group

Join Now