रामदास कदम यांना घरातूनच मिळणार मोठा झटका!

On: September 6, 2024 2:28 PM
Ramdas Kadam
---Advertisement---

Ramdas Kadam l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण आता त्यांना स्वतःच्या घरातूनच आव्हान मिळणार आहे. खेड-दापोली हा भाग माजी आमदार रामदास कदम यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आता या भागात सख्खा-चुलत भाऊच रामदास कदम यांच्यासमोर उभा ठाकणार आहे.

दापोलीमधील राजकीय गणित बिघडलं :

सध्या खेड-दापोलीमध्ये राजकीय गणित बिघडल्याचे चित्र दिसत आहे. कारण यंदाच्या वर्षी दापोली विधानसभा मतदारसंघात चुरशीचा राजकीय सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे. मागच्या काही वर्षांपासून खेड-दापोली मतदारसंघावर रामदास कदम यांच वर्चस्व कायम आहे.

मात्र आताच्या घडीला त्यांचा मुलगा योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. अशातच आता रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत.

Ramdas Kadam l सदानंद कदम कोण आहेत? :

सध्या खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनिकेत कदम यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर लावले आहेत. मात्र अनिकेत कदम हे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. या दोन्ही भावांचा घरगुती वाद आता राजकारणापर्यंत पोहोचला आहे. अनिकेत कदम हे एक उद्योजक सदानंद कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेत दापोलीमध्ये कदम यांना कदमांचेच आव्हान असणार हे चित्र स्पष्ट आहे.

अनिकेत कदम यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचं दिसून येत आहे. तसेच अनिकेत कदम यांचे वडील सदानंद कदम हे उद्योजक असून त्यांचे या मतदारसंघात चांगले वलय असल्याचं दिसत आहे.

News Title – Ramdas Kadam News

महत्त्वाच्या बातम्या-

कांद्याचे भाव कडाडले! महागड्या कांद्यापासून दिलासा मिळणार का?

रवींद्र जडेजाची दुसऱ्या इनिंगला सुरुवात! ‘या’ राजकीय पक्षात एन्ट्री

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले; काय आहे सध्या भाव?

राज्यात 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार, महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now