‘शिंदेंसोबत तसं काहीही ठरलं नव्हतं’, दिल्लीतील नेत्याने सगळं सांगूनच टाकलं

On: November 26, 2024 6:11 PM
Talks of Eknath Shinde being upset  
---Advertisement---

Eknath Shinde | महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेवरुन तिढा निर्माण झाला आहे. पाच वर्षांपूर्वी भाजप, शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच रंगली. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावरुनच भाजप, शिवसेनेत चढाओढ सुरु झाल्याचं चित्र आहे. तसेच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.

राज्यात बिहार मॉडेल राबवण्याचा आग्रह शिवसेनेचे नेते धरत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला मुख्यमंत्री करु, असा शब्द भाजपकडून शिंदेंना दिला गेला नव्हता, असं आठवलेंनी सांगितलं आहे.

“शिंदेंसोबत तसं काहीही ठरलं नव्हतं”

सत्ता आल्यावर तुम्हालाचा मुख्यमंत्री करु, असं आश्वासन जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं होतं. पण तशा प्रकारे शिंदेंना कोणताच शब्द देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे बिहार पॅटर्नचा प्रश्नच येत नाही, असं आठवले म्हणालेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाणार आहे. तसा संदेश दिल्लीतून शिंदेंना देण्यात आला आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. आपल्याला दुसऱ्यांदा संधी मिळावी, असं त्यांना वाटतं. शिवसेनेकडून बिहार फॉर्म्युला सुचवला जात आहे. पण त्या फॉर्म्युलाचा विचार करण्यासारखी आताची परिस्थिती नाही, असं आठवले म्हणालेत.

“Eknath Shinde यांनी दिल्लीत आलं पाहिजे”

भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केलं आहे. आमच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, असा संदेश भाजपकडून एकनाथ शिंदेना देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

फडणवीसांना नाहीतर ‘या’ महिला नेत्याला मुख्यमंत्री करा! कोणी केली मागणी

‘सेक्स लाईफमुळे बाॅलिवूडमध्ये…’; वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ

पराभव जिव्हारी लागला; ‘या’ बड्या नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली! कधी होणार?

आधारकार्ड संदर्भात महत्वाची माहिती; नागरिकांना होणार फायदाच फायदा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now