“मी माझं टॅलेंट विकायला आले, स्वतःला नाही!”, रामायण अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचवर थेट आरोप

On: July 31, 2025 10:02 AM
Actress Indira Krishnan
---Advertisement---

Actress Indira Krishnan | प्रसिद्ध अभिनेत्री इंदिरा कृष्णन हिने कास्टिंग काऊचबाबत एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीत तिला अशा प्रसंगांना अधिक सामोरे जावे लागले असल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.

चित्रपटसृष्टीतील चमचमाटामागे अनेकदा काळ्या सावल्या लपलेल्या असतात. ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटात कौशल्या मातेची भूमिका साकारणारी अभिनेत्री इंदिरा कृष्णन हिने स्वतःसोबत घडलेला कास्टिंग काऊचचा प्रसंग उघडपणे शेअर करत धक्का दिला आहे. (Actress Indira Krishnan)

तिने स्पष्ट सांगितले की, अभिनयाची संधी मिळावी म्हणून ती तिचं टॅलेंट विकायला आली आहे, स्वतःला नाही. तिच्या या थेट वक्तव्याने इंडस्ट्रीमधील अंतर्गत प्रथा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कटू अनुभव :

एका मुलाखतीत इंदिरा म्हणाली, “माझ्यासोबत एकदा नव्हे तर अनेकदा असे प्रसंग घडले. विशेषतः दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी हे अधिक अनुभवले. एकदा मला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारलं गेलं. पण अखेर एका अपेक्षित गोष्टीमुळे मी ती संधी नाकारली. त्यावेळी मी त्या निर्मात्याला स्पष्टपणे सांगितलं – “I came to sell my talent, not myself.””

या प्रकरणानंतर इंदिरा कृष्णनने स्वतःला मानसिकदृष्ट्या सावरलं आणि पुढे वाटचाल सुरू ठेवली.

Actress Indira Krishnan | टेलिव्हिजनमुळे मिळालं मानसिक समाधान :

कास्टिंग काऊचच्या अशा अनुभवांमुळे तिने काही मोठ्या प्रोजेक्ट्स गमावले. करिअरच्या या टप्प्यावर तिने टेलिव्हिजनकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि छोट्या पडद्यावर काम करताना अधिक समाधान आणि सन्मान मिळाल्याचं ती म्हणाली. (Actress Indira Krishnan News)

तिच्या या धाडसी उघडकीमुळे इंडस्ट्रीतील अनेक दबलेल्या गोष्टींना आवाज मिळाला आहे. अनेक कलाकार अशा अनुभवांना सामोरे जात असतानाही बोलत नाहीत, पण इंदिरा कृष्णनच्या प्रामाणिकपणामुळे या विषयावर पुन्हा एकदा समाजात चर्चा सुरू झाली आहे.

News Title: Ramayana Actress Indira Krishnan Reveals Shocking Casting Couch Experience: “I Came to Sell My Talent, Not Myself”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now