Urmila Bhatt Murder Case | 80 च्या दशकात घराघरांत पोहोचलेली रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यातील अनेक कलाकार आजही ओळखले जातात. पण या मालिकेतील एक अभिनेत्री अशीही होती जिने आपल्या अभिनयाने ओळख मिळवली, मात्र तिचं शेवटचं क्षण अत्यंत भयानक ठरले. उर्मिला भट्ट… हे नाव आज पुन्हा चर्चेत आहे तिच्या भयावह हत्येमुळे.
22 फेब्रुवारी 1997 रोजी उर्मिला भट्ट या त्यांच्या गुजरात येथील घरी एकट्या होत्या. त्याच दिवशी काही अज्ञात गुंडांनी त्यांच्या घरात घुसून, त्यांना दोरीने बांधले, अमानुष छळ केला आणि गळा कापून हत्या केली. ही घटना केवळ एक चोरी नव्हती, तर एक पद्धतशीर योजना होती. गुन्हेगारांनी घरातील मौल्यवान वस्तूंनाही लुटलं आणि पसार झाले. (Urmila Bhatt Murder Case)
पोलिसांचं अपयश? मारेकरी अजूनही सापडले नाहीत :
पोलिसांनी चौकशी केली, अनेक संशयितांची विचारपूस झाली, पण या हत्येचे गूढ आज 28 वर्षांनीही कायम आहे. कोणत्या कारणाने उर्मिला भट्ट यांची हत्या झाली? हत्यारे कोण होते? कोणी माहिती लपवत आहे का? या सगळ्याचे उत्तर अजून मिळालं नाही.
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांनी ‘तबस्सुम टॉकीज’ या त्यांच्या शोमध्ये या घटनेचा उल्लेख करत सांगितलं, “उर्मिलाची हत्या फार क्रूर होती. ती दोरीने बांधलेली होती आणि गळ्यावर खोल वार होते.” हे वर्णन ऐकून आजही अंगावर काटा येतो.
Urmila Bhatt Murder Case | उर्मिला भट्ट: अभिनय, नृत्य आणि सोज्वळतेचा प्रवास :
1934 मध्ये देहरादूनमध्ये जन्मलेल्या उर्मिला भट्ट यांना लहानपणापासूनच संगीत आणि नाट्याची आवड होती. त्यांनी लोकगीत गायिका आणि नर्तकी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर हिंदी, गुजराती आणि राजस्थानी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली.
त्यांचा शेवटचा चित्रपट ‘पापी देवता’ होता ज्यात त्यांनी धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांनी दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिकेत सुद्धा काम केलं आणि लोकप्रियता मिळवली.
एक सामान्य, समाधानी आयुष्य, पण शेवट धक्कादायक :
उर्मिलांचे लग्न गुजराती रंगभूमी कलाकार मकरंद भट्ट यांच्याशी झाले होते. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले होती. संपूर्ण कुटुंब समाधानाने राहत होते. मात्र 1997 च्या त्या एका रात्रीने सर्वकाही उद्ध्वस्त केलं. आजही त्यांच्या मुलांच्या डोळ्यांत तो दिवस कायम आहे.
उर्मिला भट्ट यांची हत्या केवळ एका अभिनेत्रीची हत्या नाही, तर त्या काळातील व्यवस्थेतील त्रुटींचं प्रतीक बनली आहे – जिथे कलाकारही सुरक्षित नाहीत, आणि गुन्हेगार मोकाट फिरत राहतात.






