‘मी कटाचा बळी ठरलो’; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

On: November 25, 2024 1:15 PM
Ram Shinde
---Advertisement---

Ram Shinde l राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यावेळी कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजप उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला आहे. मात्र आता या निवडणुकीवर राम शिंदे यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

हा सुनियोजित कट होता :

राम शिंदे म्हणाले की, कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो आहे. हे आज दिसून आलं असल्याचा खळबळजनक विधान कर्जत-जामखेडमधील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी केलं आहे. तसेच मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे देखील मागणी करत होतो.

मात्र मी सभेला आलो असतो तर नेमकं काय झालं असतं?असं अजित पवार बोलले आहेत. मात्र या विधानसभेतील हा सुनियोजित कट होता असा आरोप भाजप उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.

Ram Shinde l राम शिंदे नेमकं काय म्हणाले? :

राजकीय सारीपाटात मी स्वतः बळी ठरलो आहे. मात्र यासंदर्भात मी अगोदरच सांगितलं आहे. मला वाटतं की कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले आहेत, मात्र त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला.आहे. तसेच शरद पवार विधानसभेत पोहोचले आहेत. मात्र त्यावेळी माझा जन्म देखील झाला नव्हता. त्यामुळे मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर उभी होती. तसेच माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झाला आहे.

तसेच महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर बरोबर नाही. त्यामुळे मतमोजणी संदर्भात मी तक्रार केली आहे, मात्र आता ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील पुन्हा अर्ज करणार आहे, तर हे काय निर्णय घेतात त्यानंतर पुढे कारवाई करणार असल्याचं राम शिंदे यांनी सांगितले आहे.

News Title – Ram Shinde On Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

भाजपला मिळणार सर्वाधिक मंत्रीपदं?, महायुतीचा संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर

पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक धक्का, मनसेचं ‘इंजिन’ धोक्यात?

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘या’ तारखेला 2100 रुपये मिळणार?, मुख्यमंत्र्यांची घोषणा

RSS कडूनही ग्रीन सिग्नल, महायुतीत देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now