Rakhi Sawant | बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहणारी आणि आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंत वयाच्या 46 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलत असताना राखी सावंतने तिच्या लग्नाविषयी माहिती दिली.
कोण आहे राखीचा होणारा नवरा?
राखी सावंतचा (Rakhi Sawant) होणारा नवरा हा पाकिस्तानात पोलीस अधिकारी (Police Officer) आहे. त्याचे नाव दोडी खान (Dodi Khan) असून तो अभिनेता (Actor) देखील आहे. “मला लग्नासाठी अनेक प्रस्ताव येत होते. मात्र, मला माझे खरे प्रेम पाकिस्तानमध्ये मिळाले आहे. दोडी खान हा माझा प्रियकर आहे. लवकरच आम्ही लग्न करणार आहोत,” असे राखीने सांगितले.
View this post on Instagram
लग्न पाकिस्तानात रिसेप्शन भारतात-
पाकिस्तानात इस्लामिक (Islamic) रितीरिवाजानुसार त्यांचे लग्न होणार आहे. लग्नाची रिसेप्शन पार्टी भारतात असेल. तर, हनिमूनसाठी ते स्वित्झर्लंड (Switzerland) किंवा नेदरलँडला (Netherlands) जाणार आहेत. लग्नानंतर ते दुबईत (Dubai) राहणार असल्याचेही राखीने सांगितले.
राखी सावंतची आधीची दोन लग्ने-
2019 मध्ये राखीने एनआरआय रितेशशी (Ritesh) लग्न केल्याची माहिती आहे. मात्र, 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने आदिल खान दुर्रानी याच्यासह लग्न केले. आदिलसोबत लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता. तिने तिचे नाव बदलून राखी सावंत फातिमा ठेवल्याचा दावा करण्यात आला होता.
आदिलने सुरुवातीला नकार दिला असला तरी नंतर राखीसोबतचे लग्न मान्य केले. राखीने 2023 मध्ये मक्का येथे पहिला उमराह केला होता. मात्र, आदिलशीही तिचा घटस्फोट झाला. राखीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आदिलने सोमी खानशी लग्न केले. राखी सावंतच्या (Rakhi Sawant) या तिसऱ्या लग्नाची बातमी कितपत खरी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे पब्लिसिटी स्टंट आहे की आणखी काही, हे येणारा काळच ठरवेल.






