राखी सावंतची प्रकृती खालावली; ‘या’ आजाराने त्रस्त

On: May 15, 2024 9:02 AM
Rakhi Sawant
---Advertisement---

Rakhi Sawant l बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच वर्चस्व गाजवत असते. मात्र आता आपल्या स्टाईल आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतला अचानकपणे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या या आजारपणामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

राखी हृदयविकाराच्या गंभीर आजाराने त्रस्त :

राखी सावंतला हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याचं सांगण्यात येत आहे. तिला हृदयविकाराचा आजार होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राशिखे रुग्णालयातील भयंकर अवस्थेतील फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसत आहे.

राखी सावंतचे हे फोटो पाहून ती शुद्धीत नसल्याचे किंवा गाढ झोपेत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या राखीला हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र यासंदर्भात संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. राखी सावंत याआधीही अनेकदा दाखल झाली आहे.

Rakhi Sawant l ड्रामा क्वीन राखीच्या आजारावर नेटकऱ्यांचा विश्वास बसेना :

राखी सावंत जरी रुग्णालयात दाखल झाली असली तरी देखील राखीच्या चाहत्यांचा तिच्यावर विश्वास नसल्याचं बोललं जात आहे. कारण राखीने अनेकदा लोकांना फसवलं आहे. त्यामुळे आता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यावर नेटकऱ्यांचा विश्वासच बसत नाही आहे. राखीचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

देवा रुग्णालयातील लोकांना हिंमत दे, ती कशीही असली तरी देवा कोणाला रुग्णलयाची पायरी चढायला लावू नकोस. मात्र असं असाल तरी राखीवर विश्वास ठेवणं थोडं कठीण जात आहे, ओव्हर अॅक्टिंगचे साईट इफेक्ट्स, लवकर ठीक हो, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.

News Title – Rakhi Sawant hospitalised due to heart ailment

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हीही चहा-कॉफीचे शौकीन आहात, सावधान! शास्त्रज्ञांनी दिला भयंकर इशारा

प्रफुल पटेलांच्या ‘त्या’ कृत्यावरून शिवप्रेमींमध्ये उसळती संतापाची लाट

या दोन राशींचे नशीब हिऱ्यापेक्षाही चमकणार

कार्तिकी गायकवाडच्या घरी आला नवा गोंडस पाहुणा; कार्तिकी रोनित झाले आई-बाबा

‘या’ 2 लोकांसोबत मैत्री म्हणजे पैशांची बरबादी!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now