प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादववर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

On: January 25, 2025 1:36 PM
rajpal yadav
---Advertisement---

Rajpal yadav | बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीयन अभिनेता राजपाल यादव याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजपाल यादवच्या वडिलांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजपाल यादवला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

वृद्धापकाळाशी संबंधित आजार-

राजपाल यादव (Rajpal yadav) यांचे वडील नौरंग यादव (Naurang Yadav) वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 24 जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजपाल यादव यांचे वडील नौरंग यादव यांचे निधन झाल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

थायलंडहून दिल्लीला परतला-

अभिनेता राजपाल यादव (Rajpal yadav) यांचे वडील नौरंग यादव यांचे निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून आजारी होते, त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी राजपाल यादव थायलंडमध्ये होते. वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच 23 जानेवारी रोजी राजपाल यादव दिल्लीला पोहोचला. मात्र, शुक्रवारी (24 जानेवारी) अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

इंडस्ट्रीतून एक वाईट बातम्या-

गेल्या काही काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एकामागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. या अपघातात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, 23 वर्षीय टीव्ही स्टार अमन जयस्वालचा  रस्ता अपघातात मृत्यू झाला. दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात अमनला जीव गमवावा लागला.

दरम्यान, राजपाल यादवसह इतर 4 कलाकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यात कपिल शर्मा, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांचा समावेश आहे. राजपाल यादवला पाकिस्तानमधून धमकीचा ईमेल आला होता. “आम्ही तुमच्यावर नजर ठेवून आहोत,” असे मेलमध्ये लिहिले होते. तसेच, संदेश गांभीर्याने घेऊन गोपनीयता बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

ईमेलमध्ये काय म्हटलं होतं?

ईमेलमध्ये लिहिले होते की, मागणी मान्य केली नाही तर राजपाल यादवला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. मेल करणाऱ्याने अभिनेत्याला 8 तासांच्या आत उत्तर द्यायला सांगितले होते. उत्तर दिले नाही तर गंभीर परिणाम होतील. तसेच व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर  परिणाम होईल, असेही सांगण्यात आले होते. “आम्हाला पुढच्या 8 तासांत त्वरित प्रतिसादाची अपेक्षा आहे. उत्तर दिले नाही तर तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही, असे आम्ही समजू आणि मग पुढे आवश्यक ती कारवाई करू,” असेही धमकी देणाऱ्याने म्हटले होते.

News Title : Rajpal Yadav’s father passes away

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now