विराटला डावललं! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मिळाला युवा कर्णधार!

On: February 13, 2025 1:01 PM
RCB Captain
---Advertisement---

RCB Captain l आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार (RCB Captain) कोण असेल? या प्रश्नावरील पडदा आता उठला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी आपला नवीन कर्णधार जाहीर केला आहे. युवा खेळाडू रजत पाटीदारवर (Rajat Patidar) टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

रजत पाटीदारची आयपीएल कारकीर्द :

रजत पाटीदारने (Rajat Patidar) आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. पाटीदारने 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 54 चेंडूत 112 धावांची खेळी केली होती. प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा तो पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला होता. (RCB Captain)

RCB Captain l RCB ला विजेतेपद पटकावून देणार का? :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांना आता मोठी आशा आहे की, रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली टीम नक्कीच विजेतेपद पटकावेल. कारण पाटीदार एक युवा आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे आणि त्याच्याकडे नेतृत्व क्षमता देखील आहे. त्यामुळे तो टीमला नक्कीच पुढे घेऊन जाईल, असा विश्वास चाहत्यांना आहे.

News title : Rajat Patidar RCB News Captain

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now