‘मालिकेतील सह-कलाकाराच्या गाडीतून…’, श्वेता तिवारीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचा गौप्यस्फोट!

On: June 30, 2025 7:29 PM
shweta tiwari
---Advertisement---

Raja Chaudhary | टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा (Shweta Tiwari) पूर्वाश्रमीचा पती, अभिनेता राजा चौधरीने (Raja Chaudhary) पुन्हा एकदा जुन्या वादाला तोंड फोडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, राजाने श्वेता आणि तिचा ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) मालिकेतील सह-कलाकार सिझान खान (Cezanne Khan) यांच्यात संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला आहे, ज्यामुळे टीव्ही जगतातील एक जुना अध्याय पुन्हा चर्चेत आला आहे.

नक्की काय घडलं?

दिलेल्या मुलाखतीत राजा चौधरीने सांगितले की, त्याचा आणि श्वेताचा कायदेशीर घटस्फोट २०१२ मध्ये झाला असला तरी, तो २००३ मध्येच व्हायला हवा होता. त्याने एका संशयास्पद घटनेचा उल्लेख केला, ज्यामुळे त्याचा संशय अधिक बळावला होता. राजा म्हणाला, “एकदा मी अनपेक्षितपणे सेटवर गेलो, तेव्हा श्वेता सिझान खानच्या गाडीतून, त्याच्यासोबतच उशिरा पोहोचली. सकाळपासून शूटिंग सुरू असूनही ते अजून सेटवर पोहोचले नव्हते.”

याबद्दल जेव्हाही आपण श्वेताला (Shweta Tiwari) जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या दारू पिण्याच्या सवयीवर खापर फोडून मूळ विषय टाळला जात असे, असा आरोपही राजाने केला. “मला कधीच प्रश्न विचारण्याची परवानगी दिली गेली नाही आणि नेहमी दोष माझ्यावरच ढकलला गेला,” असे तो म्हणाला.

श्वेता तिवारीने हे सर्व आरोप फेटाळले-

विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिवारीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. “माझे अनेकांशी अफेअर असल्याचे म्हटले जाते. कधी? कोणी मला कधी कोणत्या कॉफी शॉपमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले आहे का? अफेअरसाठी माझ्याकडे वेळ तरी कुठे आहे?” असा सवाल तिने केला होता. इतकेच नाही, तर सिझानबद्दल बोलताना ती स्पष्टपणे म्हणाली होती, “मी त्याच्यासोबत पॅचअप का करू? मी त्याचा तिरस्कार करते!!”

राजा चौधरीच्या या ताज्या आरोपांवर श्वेता तिवारीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिच्या शांततेमुळे सोशल मीडियावर या जुन्या प्रकरणाबद्दलच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

News Title -Raja Chaudhary Claims Shweta Tiwari Had Affair

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now