Raj Thackeray | महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेतील मतदारयादीतील घोळ पुन्हा चर्चेत आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका करत नोटीफिकेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 232 जागा निवडून आल्यावरही संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित जल्लोष न दिसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (Maharashtra election commission criticism)
आयोग स्वतः करत आहे घोळ, निवडणुकीसाठी पक्षांना माहिती नाही :
राज ठाकरे म्हणाले, “पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा अशी निवडणूक ही कशी?” त्यांनी आयोगाच्या कारभारावर सखोल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आजच्या बैठकीत राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची भेट घेतली. या बैठकीत नेत्यांनी मतदारयादीतील चुका आणि तांत्रिक दोषांसह आयोगाच्या कारभाराची चिरफाड केली. (voter list errors)
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, मतदारयादीत घोळ सुरुच आहे. राजकीय पक्षांना ही यादी दाखवत नसल्यामुळे पहिला घोळ येथेच आहे. “निवडणुका लढवायच्या आहेत, पण मतदार कोण आहेत हे माहित नसल्यास लढा कसा?” असेही ते म्हणाले. 2022 मधील यादीत फोटो, नाव सर्व असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र 2025 च्या जिल्हा परिषदेच्या यादीत फोटो काढण्यात आले आहेत. “हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करत आहे, हे का करत आहे?” अशी तीव्र टीका त्यांनी केली.
Raj Thackeray | नोटिफिकेशन रद्द करण्याची मागणी :
राज ठाकरे म्हणाले की, आयोग म्हणतो की मतदारांची यादी गोपनीय असते, परंतु ऑनलाईन यादीत फोटो, नाव सर्व सार्वजनिक असल्यास गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होतो. “आपण कोणाला मतदान करतोय हे गोपनीय आहे, पण मतदार कसा गोपनीय असेल?” अशी तर्कसंगत विचारणा त्यांनी उपस्थित केली. (Maharashtra election commission criticism)
राज ठाकरे यांनी सांगितले की, आयोगाने 8 दिवसांच्या कालावधीची नोटीफिकेशन दिली आहे. “सहा महिने किंवा आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षांना आठ दिवसांत सगळी छानणी करून द्यायची? हे शक्य नाही,” असेही त्यांनी म्हटले. म्हणून नोटीफिकेशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मागील पाच वर्षांत निवडणुका झाल्या नाहीत, तर याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेल्यास फरक काय पडतो?






