राज ठाकरेंनी सरकारकडे केली पहिली मागणी; काय आहे मागणी?

On: December 9, 2024 3:07 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray l राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव या गावातील प्रकरणावर लक्ष वेधलं आहे. तळेगाव गावातील एकूण शेतजमीनीपैकी जवळपास 75 टक्के शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या प्रकरणावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं प्रकरण काय? :

वक्फ बोर्डाने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास 75 टक्के शेतजमिनीवर हक्क दाखवला आहे. मात्र यामुळे आता तब्बल 103 कुटुंबच जगणं धोक्यात आलं आहे. मात्र यासंदर्भात जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी देखील हे पुरेसं नाही.

कारण हा प्रश्न फक्त जमिनीपुरता नाही तर वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने सादर देखील केलं होतं, मात्र त्यावेळी संसदेत गोंधळ घातला होता. मात्र आता याच कारणामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं आहे.

Raj Thackeray l राज ठाकरेंची मागणी काय? :

मात्र आता या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, त्यामुळे आता हे वेगळं सांगायला नको. मात्र आता तळेगाव गावातील प्रकरणावरून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला पाठिंबा दिला आहे.

जर एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही? हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे. तसेच वक्फ बोर्डाची सध्या जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे लक्षात येईल असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये देखील म्हटल आहे. मात्र आता माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर घ्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी महायुती सरकारकडे केली आहे.

News Title : Raj Thackeray On Waqf Board

महत्वाच्या बातम्या –

एकनाथ शिंदे नवा डाव टाकणार? ‘या’ कारणामुळे 5 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार

लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी होणार की नाही? तटकरेंनी दिली माहिती

ते ही पुन्हा आले! विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

“लाडक्या बहिणींना नोटीस पाठवून पैसे परत…”, संजय राऊतांनी केला धक्कादायक खुलासा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now