मुंबईत टोलमाफी! राज ठाकरे म्हणाले,”आमच्या आंदोलनाला यश..”

On: October 14, 2024 12:28 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. आज 14 ऑक्टोबररोजी राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी महत्वाचा निर्णय म्हणजे, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठं गिफ्टच मिळालं आहे. (Raj Thackeray)

हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. या निर्णयानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया उमटली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट जशास तशी-

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. (Raj Thackeray)

पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही.

“मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले”

खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray)

News Title : Raj Thackeray On Mumbai Toll Waiver

महत्वाच्या बातम्या-

महागड्या गाड्या, आलिशान घर, बाबा सिद्दीकींच्या संपत्तीचा आकडा समोर

आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, पण नेमकी कुठे?

राज्यात ‘या’ दिवशी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता?

शाहरुख खानच्या मुलावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप; म्हणाली, “तो मला प्रायव्हेट व्हिडिओ..”

Join WhatsApp Group

Join Now