राज ठाकरेंची तोफ ‘या’ तारखेला मुंबईत धडाडणार! सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं

On: October 16, 2025 2:49 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा राजकीय पातळीवर सक्रीय झाले आहेत. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तातडीचा पक्ष मेळावा बोलावल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मुंबईत 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या या बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी सलग भेटी घेतल्या होत्या. मतदारयादीतील त्रुटी आणि घोळ यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मतदारयादीत दोष असल्यास निवडणूक सहा महिने पुढे ढकला, अशी मागणी त्यांनी केली होती.

राज ठाकरे आक्रमक मोडमध्ये, मेळाव्यात निवडणूक रणनीतीवर फोकस :

विधानसभा निवडणुकीत अपयशानंतर राज ठाकरे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत बुथनिहाय मतदारयादीची पडताळणी आणि संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. (Raj Thackeray)

आता रविवारी होणाऱ्या मेळाव्यात BLA (Booth Level Agents), गटाध्यक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत आगामी निवडणुकीसाठीची रणनीती, मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या आणि प्रचार मोहिमेची दिशा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Raj Thackeray | मनसेत उत्सुकता, राज ठाकरेंकडून नव्या सूचनांची अपेक्षा :

या तातडीच्या मेळाव्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय नवं जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेळाव्यात मनसेच्या प्रचार धोरणात काही महत्त्वाचे बदल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात राज ठाकरेंची ‘तोफ’ पुन्हा धडाडणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

News Title: Raj Thackeray Calls Urgent MNS Meeting Amid Election Buzz; Major Announcement Expected Before Diwali

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now