“काढणीला आलेलं पीक गेलं, सरकारने आता लाडका शेतकरी..”; राज ठाकरेंचं आवाहन

On: September 4, 2024 11:47 AM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस झाला. येथे पुरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस ओसरला असला तरी यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक पिके आडवी झाली आहेत. तर कुठे जनावरे पाण्यात वाहून गेली. राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 1.70 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. (Raj Thackeray)

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. गणपतीच्या सणांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, असं आवाहन त्यांनी महायुती सरकारला केलं आहे.

“सरकारने शेतकरी पण लाडका असल्याचं दाखवून द्यावं”

“गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं.”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.(Raj Thackeray)

“सरकारने मदतीचा हात आखडता घेऊ नये”

“तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल”, असे आदेश देखील राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.(Raj Thackeray)

या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

News Title : raj thackeray appeals govt to help farmers

महत्वाच्या बातम्या-

शनीदेव ‘या’ राशींना करणार धनवान, राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने उजळणार भाग्य

येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

“स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर शिवरायांचा पुतळा पडला नसता”

ढोल-ताशा वादकांसाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार, साताऱ्यातील घटनेनं मोठी खळबळ

Join WhatsApp Group

Join Now