Raj Thackeray | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी लढत होणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे.
भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी (MVA) यांच्यात जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दोन उमेदवारांची घोषणा केलीये. राजू पाटील यांच्या नव्या कार्यलयाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज बोलत होते.
मंचावरून भाषण करतानाच राज यांनी दोघांची तिकीटे जाहीर केली. राजू पाटील यांच्या नव्या कार्यलयाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज बोलत होते.
कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच ठाणे शहर विधानसभेतून मनसे नेते अविनाश जाधव यांनाही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उमेदवारी घोषित केली.
काय म्हणाले Raj Thackeray?
आज किंवा उद्या मनसेची यादी जाहीर होईल. यादी जेव्हा जाहीर होईल त्याच्या आधी आज इथे आलोच आहे तर राजू पाटील कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर विधानसभा करीता अविनाश जाधव यांचे नाव जाहीर करतो. येत्या 24 तारखेला मी अविनाश जाधव आणि आपले राजू दादा यांचा फॅार्म भरायला येतोय. मी भाषण करायला आलो नाही. मी राजू पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करायला आलोय. माझं आधीचं घर छोटं पडत होतं म्हणून मोठे घर घेतलं. अशा भेट वस्तू मिळत असतील तर आणखी मोठं घर घ्यावं लागेल, असं राज ठाकरे म्हणालेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेने अधिकृतपणे उमेदवार यादी जाहीर केली नाही. मात्र राज ठाकरेंनी मंचावरून भाषण करतानाच दोघांची तिकीटे जाहीर केलीत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज!
शरद पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेताही तुतारी हाती घेणार
अखेर सत्य उघड! अभिषेकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, ऐश्वर्याला देणार घटस्फोट?
तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर
अजितदादा गटाची यादी थोड्याच वेळात जाहीर; ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब






