राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

On: May 15, 2025 8:31 AM
Mumbai Red Alert
---Advertisement---

Rain Alert | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावल्यामुळे वातावरणात बदल जाणवत आहे. आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १४ ते १८ मे या दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या काळात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये ३० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच, वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Rain Alert  | हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने आज, १५ मे रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर आणि परिसरातील घाटमाथा, तसेच सातारा शहर आणि परिसरातील घाटमाथा या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर, आहिल्यानगर (अहमदनगर) आणि नाशिक जिल्ह्याला देखील जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. ‘ऑरेंज अलर्ट’ चा अर्थ या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना या काळात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडू शकतात, विजेचे खांब कोसळून नुकसान होऊ शकते आणि वीज पुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

News Title- Rainfall Expected in Mumbai, Thane and Other Districts, What is the Weather Department’s Forecast?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now