मराठवाड्यात पावसाचा कहर! नांदेड, यवतमाळ व हिंगोलीत अतिवृष्टी, अनेक नद्यांना पुर

On: September 2, 2024 10:23 AM
Pune IMD Weather Update
---Advertisement---

Rain update | मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड, परभणी व हिंगोलीत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हिंगोलीत घरात पावसाचे पाणी शिरल्याने 200 पेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. (Rain update )

नांदेडमध्ये शहरात पाच तालुक्यांत अतिवृष्टी झालीये.परभणीतही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोलीत तर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच कयाधू नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे दिसून आले.

मराठवाड्यात मुसळधार पाऊस

तर, परभणीमधील दैठणा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने दैठणा ते माळसोन्ना रस्त्यावर पाणी साचले होते.परभणीत रविवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरासरी 20.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच नांदेड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हदगाव, भोकर, किनवट, माहूर व हिमायतनगर या तालुक्यांसह 26 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.(Rain update )

जालन्यात देखील अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. मंठामधील पांगरी, पाटोदा, सांगवी गावासह पाच ते सहा गावामध्ये पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे. पांगरी गावचा संपर्क तुटल्यामुळे, गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं गेलं आहे. पांगरी आणि गावात पाझर तलाव पूर्ण क्षमेतेनं भरल्यानं तो फुटण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे.

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणाचे धनंजय मुंडेंचे आदेश

सध्या जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 87 टक्के आहे. जायकवाडीतून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, परभणी, वाशिम, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून अनेक भागांतील शेतात पाणी साचलं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून मोठं नुकसान झालं आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.(Rain update )

News Title :  Rain update Marathwada September 2

महत्वाच्या बातम्या-

वनराज आंदेकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट; गोळीबाराचा VIDEO आला समोर

पुण्यात राष्ट्रवादी नेत्याची गोळ्या झाडून हत्या, पोलिसांनी तीन जणांना घेतलं ताब्यात

पुणे हादरलं! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार व कोयत्याने वार करून हत्या

आज शेवटच्या श्रावण सोमवारी ‘या’ राशींचं भाग्य उजळणार, नशिबात सुख-समृद्धी देणार

‘…अन्यथा तुतारी वाजवू’; राष्ट्रवादीच्याच नेत्याचा अजित पवारांना इशारा

Join WhatsApp Group

Join Now