Rain Alert | पश्चिम-मध्य अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित झाले असून त्याची तीव्रता कमी झाली आहे. या प्रणालीमुळे राज्यभर ढगाळ वातावरण तयार झाले आहे आणि अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. हवामान खात्याने कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण कायम असून तापमानात किंचित घट झाली आहे. परतीच्या मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर हवामानातील बदल स्पष्ट दिसत आहे. (Maharashtra Rain Update)
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? :
हवामान विभागानुसार आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain Alert)
तसेच मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे, बीड, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)
मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे तब्बल 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर अमरावती येथे 34.8°C उच्चांकी तापमान नोंदले गेले आहे.
Rain Alert | मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू :
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून मॉन्सून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (Maharashtra Rain Alert)
सप्टेंबरच्या अखेरीस मॉन्सून गुजरात आणि उत्तर भारतातून मागे सरकला होता. आता हवामानातील दाब बदलामुळे राज्याच्या काही भागांतून परतीचा मॉन्सून पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.






