सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पश्चिम रेल्वेत मोठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

On: August 28, 2025 5:06 PM
Railway Recruitment 2025
---Advertisement---

Railway Recruitment 2025 | रेल्वेमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती कक्षाने एकूण 2,865 पदांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर केली आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करणे गरजेचे आहे, कारण शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

भरतीतील जागांचे तपशील :

सामान्य प्रवर्ग : 1150 पदे

अनुसूचित जाती (SC) : 433 पदे

अनुसूचित जमाती (ST) : 215 पदे

ओबीसी : 778 पदे

ईडब्ल्यूएस : 289 पदे

Railway Recruitment 2025 | पात्रता आणि वयोमर्यादा :

– उमेदवारांचे वय 16 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

– SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षे सूट दिली जाईल.

– उमेदवाराने 10 वी आणि 12 वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

– आयटीआय (NCVT/SCVT मान्यताप्राप्त) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. (Railway Recruitment 2025)

निवड प्रक्रिया :

या भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे 10 वी आणि 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर अवलंबून असेल.

अर्ज शुल्क :

सामान्य, OBC, EWS उमेदवार : ₹100 अर्ज शुल्क + ₹41 प्रक्रिया शुल्क

SC/ST उमेदवार : फक्त ₹41 प्रक्रिया शुल्क

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट आकाराचा फोटो

10 वी प्रमाणपत्र

आयटीआय प्रमाणपत्र (Railway Recruitment 2025)

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

इच्छुक उमेदवारांना पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका, अन्यथा तांत्रिक कारणामुळे संधी गमावली जाऊ शकते. तसेच ही भरती रेल्वेमध्ये करिअर करण्याची मोठी संधी आहे. म्हणूनच पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्टपासून त्वरित अर्ज प्रक्रिया सुरू करावी.

News Title : Railway Recruitment 2025: Western Railway Apprentice Bharti for 2,865 Posts – Apply Online from 30 August

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now