Railway Recruitment 2025 | 2025 या नवीन वर्षात तरुणांना नोकरीची मोठी संधी असणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी चालून आली आहे. सध्या रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र असेल, तर भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. (Railway Recruitment 2025)
रेल्वेने मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने 4232 शिकाऊ पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. या जानेवारी महिन्यातच यासाठी अर्ज करता येणार आहेत.
कोणत्या पदांची भरती होणार?
रेल्वेच्या या भरतीअंतर्गत वेगवेगळ्या ट्रेडमध्ये नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक, एसी मेकॅनिक, पेंटर आणि इतर समावेश आहे. सर्वाधिक पदे ही इलेक्ट्रिशियन तब्बल 1053 पदे आणि 1742 पदे फिटरसाठी आहेत.
या अंतर्गत AC मेकॅनिकच्या 143 जागा, वेल्डरच्या 713 जागा, डिझेल मेकॅनिकच्या 142 जागा, पेंटरच्या 74 जागा आणि इतर ट्रेडसाठी पदे आहेत. (Railway Recruitment 2025)
पात्रता काय?
इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य असून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. असे युवक या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयाची मर्यादा व अर्ज फिस किती?
इच्छुक उमेदवाराचे कमाल वय 24 वर्षे निश्चित करण्यात आले असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे. इच्छुक उमेदवार रेल्वे रिक्रूटमेंट सेल https://scr.indianrailways.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. तसेच सामान्य/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना भरतीसाठी 100 रुपये शुल्क असून SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. (Railway Recruitment 2025)
News Title : Railway Recruitment 2025
महत्त्वाच्या बातम्या-
वाल्मिक कराडला धक्का, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!
नवीन वर्षाचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ!
मुंडेंच्या ‘त्या’ भेटीनंतर कराडचं शरणनाट्य, त्याला लपवून ठेवलं, मोठा खुलासा समोर
“…म्हणून वाल्मिक कराड शरणागती आला”, सुरेश धस यांचा मोठा खुलासा!
वाल्मिक कराडांसोबत असलेल्या व्यक्तीने सांगितला सर्व ठावठिकाणा!






