Railway Job 2024 | बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. युवकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची नवी संधी असणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता या भरतीसाठी अर्ज कसा करायचा, वयाची अट काय असणार, पगार किती मिळणार?, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (Railway Job 2024)
कोणती पदे भरणार?
कोकण रेल्वे भरती अंतर्गत एकूण 190 पदे भरली जाणार आहेत.
वरिष्ठ विभाग अभियंता
तंत्रज्ञ
असिस्टंट लोको पायलट
स्टेशन मास्टर
गुड्स ट्रेन मॅनेजर
कमर्शियल पर्यवेक्षक
ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट मॅन या पदांचा समावेश आहे.
(या पदांसाठी फक्त गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मूळ रहिवासी अर्ज करु शकणार आहेत. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी आपली जमीन गमावली किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे कोकण रेल्वेचे कर्मचारी आहेत ते देखील फॉर्म भरू शकतात.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 16 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख ही 6 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:59 पर्यंत असेल. त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करण्यास सुरुवात करावी. (Railway Job 2024)
पात्रता काय असणार?
वरिष्ठ विभाग अभियंता इलेक्ट्रिकल या पदासाठी, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमधील पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येईल. तंत्रज्ञ पदासाठी संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा असलेले मॅट्रिक उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. यासाठी वयोगट 18 ते 36 ठेवण्यात आली आहे. (Railway Job 2024)
परीक्षेचे स्वरूप आणि पगार किती असणार?
उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर रिक्त पदानुसार अॅप्टीट्यूड टेस्ट होईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. काही पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीही द्यावी लागेल.अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 885 रुपये शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना देखील शुल्क भरावे लागणार आहे. (Railway Job 2024)
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे.सिनीअर सेक्शन इंजीनिअरला पदासाठी वेतन 49 हजार रुपये प्रति महिना असेल.तंत्रज्ञ पदासाठी 19 हजार 900 रुपये पगार आहे. तर, स्टेशन मास्टर पदाचा पगार 35 हजार 400 रुपये आहे.
News Title : Railway Job 2024
महत्वाच्या बातम्या-
आज ‘या’ राशींवर राहील स्वामींची अपार कृपा, आर्थिक चणचण संपणार!
पुण्यात गणपती मिरवणुकीला येताय? तर या ठिकाणी करा गाड्या पार्क, मेट्रोचं काय?
‘या’ अभिनेत्रीने पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केला; स्वतः दिली कबुली
मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांच्या मनातील गोष्ट आली ओठावर






