‘पोरखेळ करताय का?’; सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना झापलं

On: October 13, 2023 1:47 PM
---Advertisement---

मुंबई | पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना झापलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नार्वेकरांना चांगलंच सुनावलंय.

या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, असंही सरन्यायाधीश म्हणालेत.

अध्यक्षांचं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही, असं म्हणत सरन्यायाधीश विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रचंड नाराज झाले होते. 

अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल, असंही सरन्यायाधीश सुनावणीदरम्यान म्हणाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now