ते ही पुन्हा आले! विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड

On: December 9, 2024 11:47 AM
Maharashtra Opposition Leader
---Advertisement---

Rahul Narvekar l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झालं आहे. अशातच 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज देखील सुरु झाले आहे.

अखेर विधानसभा अध्यक्षांची निवड झाली :

सध्या मुंबईत महाराष्ट्र राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर या दोन दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला. मात्र यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. अशातच विशेष अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र आज अखेर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यावेळी देखील भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

Rahul Narvekar l विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस :

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळलं होतं. तसेच उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे राहुल नार्वेकर हे राज्यभर चांगलेच चर्चेत आले होते.

तसेच राहुल नार्वेकर यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच त्यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. तसेच आज विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

News Title : Rahul Narvekar elected as Maharashtra Legislative Assembly Speaker

महत्वाच्या बातम्या –

“लाडक्या बहिणींना नोटीस पाठवून पैसे परत…”, संजय राऊतांनी केला धक्कादायक खुलासा

“…तर रवी राणा राजीनामा देतील”; नवनीत राणांचं ओपन चॅलेंज

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार, IMD कडून अलर्ट

मोठी बातमी! लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 7000 रुपये, काय आहे नवी योजना?

“मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर ठरवा, आधी…”; ‘या’ बड्या नेत्याची महायुतीकडे मोठी मागणी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now