पाय फ्रॅक्चर असूनही राहुल द्रविड नाचू लागला; व्हिडीओ आला समोर

On: April 29, 2025 9:36 AM
Vaibhav Suryawanshi Century
---Advertisement---

Vaibhav Suryawanshi Century | राजस्थान रॉयल्सच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryawanshi Century) आपल्या वादळी खेळीने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात फक्त 35 चेंडूत शतक ठोकत त्याने नवा विक्रम रचला. विशेष म्हणजे, वैभवच्या या अविस्मरणीय खेळीने डगआऊटमध्ये बसलेले प्रशिक्षक राहुल द्रविड देखील आपल्या भावना आवरू शकले नाहीत. पाय फ्रॅक्चर असूनही ते आनंदात उठून टाळ्या वाजवताना दिसले.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. गुजरात टायटन्सने 20 षटकांत 209 धावा करत राजस्थानसमोर 210 धावांचे मोठे आव्हान उभे केले. मात्र, राजस्थानने अवघ्या 15.5 षटकांत हे लक्ष्य सहज पार केले. या विजयात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची तुफानी शतकी खेळी निर्णायक ठरली.

वैभवचा विक्रमी पराक्रम आणि डगआऊटमधील जल्लोष :

वैभवने 11 षटकार मारत केवळ शतकच नाही तर एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजाचा मान देखील पटकावला. युसुफ पठाणचा 37 चेंडूंत शतकाचा विक्रम मोडून, त्याने 35 चेंडूंत ऐतिहासिक शतक साजरं केलं. सर्वात वेगवान शतकाच्या यादीत तो ख्रिस गेलनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

राशिद खानच्या गोलंदाजीवर वैभवने षटकार ठोकत शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर राजस्थानच्या डगआऊटमध्ये जल्लोष उसळला. राहुल द्रविड यांना पाय फ्रॅक्चर असूनही आनंदात उभं राहून टाळ्या वाजवल्या. हा दृश्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Vaibhav Suryawanshi Century | वैभव सूर्यवंशीचं स्वप्न साकार :

सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, “हे माझं आयपीएलमधील पहिलं शतक आहे. ही माझी फक्त तिसरी इनिंग होती. सरावादरम्यान केलेल्या मेहनतीचं फळ आज मिळालं आहे. मी कोणत्याही भीतीशिवाय खेळतो आणि फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतो.”

राजस्थान रॉयल्सचा हा शानदार विजय आणि वैभव सूर्यवंशीची आगळीक गाजलेली खेळी यामुळे संघाचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

News Title: Rahul Dravid’s Emotional Celebration After Vaibhav Suryawanshi’s Record Century Despite Fractured Leg | IPL 2025

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now