Rahul Dravid Accident l टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच राहुल द्रविडला रागावताना पाहिले गेले असेल. आपल्या शांत स्वभावामुळेच वेगवान गोलंदाजांना थकवून सोडण्यात तो पटाईत आहे. मात्र मंगळवारी त्याच्याच बंगळुरू शहरात ‘मिस्टर कूल’ अशी ओळख असलेल्या द्रविडला रस्त्याच्या कडेला संतापलेले पाहायला मिळाले. एका पिकअप चालकाच्या चुकीमुळे त्याच्या उभ्या असलेल्या गाडीला धडक बसल्याने तो रागावला होता. (Rahul Dravid Accident)
नेमके काय घडले? :
द्रविड या चालकाशी वाद घालताना दिसला आणि चूक असूनही तो पिकअप चालक त्याच्याशी भांडताना दिसला. मात्र, हा वाद काही वेळातच मिटला आणि याप्रकरणी कोणतीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या छोट्याशा धडकेमुळे कोणीही जखमी झालेले नाही.
ही घटना बंगळुरूच्या कनिंगहॅम रोड परिसरातील आहे, जो शहरातील व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. येथे द्रविडच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला या पिकअप चालकाने मागून धडक दिली. या धडकेमुळे द्रविडची गाडी पुढे उभ्या असलेल्या गाडीला जाऊन धडकली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये द्रविड आणि तो पिकअप चालक स्थानिक कन्नड भाषेत रागाने वाद घालताना दिसले. (Rahul Dravid Accident)
Rahul Dravid Accident l पोलिसांची प्रतिक्रिया :
व्हिडिओमध्ये दोघांचाही आवाज फारसा ऐकू येत नसल्याने नेमके कोण काय म्हणत आहे हे कळू शकले नाही. या घटनेवर प्रतिक्रिया देताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, “इतर छोट्या-मोठ्या घटनांप्रमाणेच ही घटनाही घटनास्थळीच मिटवण्यात आली असावी. आम्हाला अशी कोणतीही तक्रार मिळालेली नाही.” या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
शांत स्वभावाचा द्रविड संतापला :
राहुल द्रविड त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण बंगळुरूमध्ये घडलेल्या या घटनेत त्याचा संयम सुटला आणि तो पिकअप चालकाशी वाद घालताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Anyone who argues with Rahul Dravid is my enemy as wellpic.twitter.com/3XVMBl1vbl
— Incognito (@Incognito_qfs) February 4, 2025






