नववर्षात गुड न्यूज, लाडक्या बहीणींनो 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?

On: January 6, 2025 10:25 AM
Radhakrishna Vikhe Patil on Ladki Bahin Yojana benefits 
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली. जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. निवडणुकीपूर्वी महायुतीने पुन्हा सत्तेत आलो तर 1500 ऐवजी 2100 रुपये महिलांना देऊ, अशी घोषणा केली होती. महिलांना नुकताच डिसेंबरचा हप्ता देण्यात आला. आता 2100 रुपये कधी मिळणार, सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार का?, याबाबत बोललं जातंय. (Ladki Bahin Yojana)

अशात लाडक्या बहिणीांना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत एक महत्वाचं विधान केलंय. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार, असं म्हटलंय. आता सरकारकडून महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सरकारने जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. (Ladki Bahin Yojana)

या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून  लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. महायुतीला विधानसभेत या योजनेमुळे प्रचंड बहुमत मिळाले. सरकारने निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे असे एकूण 3 हजार रुपये एकत्रित महिलांच्या खात्यावर जमा केले होते.

जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?

दरम्यान, आतापर्यंत 2 कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारकडून जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर, डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यात आलाय. आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, याची महिला प्रतिक्षा करत आहेत. (Ladki Bahin Yojana)

News Title –  Radhakrishna Vikhe Patil on Ladki Bahin Yojana benefits 

महत्त्वाच्या बातम्या-

17 मोबाईल नंबर, 100 बँक खाती अन्..; वाल्मिक कराडबाबत सुरेश धसांचा मोठा खुलासा

ब्रेकिंग! प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक

‘खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक?’; सुरेश धसांच्या आरोपांनी खळबळ

टीम इंडियाला धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती

आज शनीचा उत्तरभाद्रपद नक्षत्र ‘या’ राशींना करणार धनवान!

Join WhatsApp Group

Join Now