‘शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही’; पुरंदरच्या शेतकऱ्यांना मुरलीधर मोहोळांनी दिला शब्द

On: May 12, 2025 1:35 PM
Murlidhar Mohol
---Advertisement---

Purandar Airport | पुरंदर विमानतळाच्या उभारणीसंदर्भात शेतकऱ्यांच्या (Farmers) मागण्या मान्य करण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार (State Government) योग्य प्रकारे काम करत आहे, अशी ग्वाही नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (Minister of State for Civil Aviation) मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

देशात कोठेही नवीन विमानतळ निर्माण करताना, राज्य सरकार जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडते. पुरंदर विमानतळासाठी (Airport) देखील राज्य सरकारने प्रत्येक गावाला स्वतंत्र भूसंपादन अधिकारी नेमला आहे, जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

लोहगाव विमानतळासमोरील एरो मॉल येथे ‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’ या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे (Training Centre) उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या हस्ते रविवारी, ११ मे रोजी झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) सारिकाकुमारी (Sarikakumari) उपस्थित होत्या.

मंत्री मोहोळ म्हणाले की, “पुण्यात विमानसेवेशी संबंधित प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्याने, या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढतील. विमान कंपन्यांना  भविष्यात कुशल मनुष्यबळाचीआणि प्रशिक्षित तरुणांची मोठी गरज भासणार आहे.”

विमानसेवेची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी नवीन तेराशे विमानांची नोंदणी केली आहे. त्यामुळे, भविष्यात विमानसेवेशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित आणि तज्ञ मनुष्यबळाची मोठी आवश्यकता निर्माण होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Title : Purandar Airport: Farmers’ Interests Protected Says Mohol

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now