पंजाबराव डख यांचा पावसाबद्दल महत्वाचा अंदाज, शेतकऱ्यांनाही दिला सल्ला

On: September 16, 2024 9:34 AM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain | राज्यभरात सध्या कुठे पाऊस तर कुठे ऊन असं वातावरण दिसून येतंय. अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. तर, काही भागात अजूनही जोरदार पाऊस बरसत आहे. अशात पावसाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबरच्या शेवटी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. तर, काही जिल्ह्यात अलर्ट राहण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Rain)

YouTube video player

राज्यात पुढील 5 ते 6 दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहील. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार. 21 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होईल.

21 सप्टेंबरनंतर पाऊस वाढणार

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार आहे. यासोबतच राज्यातील काही जिल्ह्याला अलर्ट राहावे, असं आवाहन देखील डख यांनी केलंय. (Maharashtra Rain)

21 तारखेनंतर नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. येथे पावसाचा जोर अधिक असणार असल्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी काढणीला आलेलं पीक काढून घ्यावं

एकंदरीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच सतर्क राहावं, असा सल्ला डख यांनी दिलाय. या काळात पिकांची काळजी घ्यावी. उडीद, सोयाबीन ही पीकं शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे. 21 तारखेनंतर जोरदार पाऊस होणार आहे, त्यापूर्वी हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिकं काढून घ्या, असा सल्ला डख यांनी दिला आहे. (Maharashtra Rain)

ऑक्टोबर महिना हा पावसाने सुरू होईल. 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.त्यामुळे यंदा नोव्हेंबर महिन्यापासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.

News Title- Punjabrao Dakh Prediction of Maharashtra Rain

महत्वाच्या बातम्या-

धनगर आरक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

महादेव आज ‘या’ राशींवर प्रसन्न होणार, वाचा सोमवारचे राशीभविष्य

राज्यात आज कुठं कुठं पाऊस पडणार?, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

आज ‘या’ 3 राशींना लाभणार सूर्यदेवाची कृपा, सर्व संकट होणार दूर!

Join WhatsApp Group

Join Now