२ लाखांचा पगार, पण DIG च्या घरी सापडला कुबेराचा खजिना; नोटा मोजण्यासाठी मागवाव्या लागल्या ३ मशीन

On: October 17, 2025 2:18 PM
Harcharan Singh Bhullar
---Advertisement---

Harcharan Singh Bhullar | पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) रोपार रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर (Harcharan Singh Bhullar) यांच्या घरी सीबीआयने (CBI) टाकलेल्या छाप्यामध्ये अक्षरशः कुबेराचा खजिना सापडला आहे. केवळ २ लाख रुपये मूळ पगार असलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ७ कोटी रुपयांची रोकड, दीड किलो सोने आणि आलिशान गाड्यांसह कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

८ लाखांची लाच आणि सीबीआयचे जाळे :

डीआयजी हरचरण भुल्लर (Harcharan Singh Bhullar) यांनी फतेहगड साहिबमधील मंडी गोविंदगड येथील एका भंगार विक्रेत्याकडे मध्यस्थांमार्फत ८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही त्यांनी दिली होती. या भंगार विक्रेत्याच्या तक्रारीनंतर सीबीआयने सापळा रचून गुरुवारी भुल्लर यांना अटक केली. त्यानंतर दिल्ली आणि चंदीगड येथील ५२ सदस्यांच्या सीबीआय पथकाने भुल्लर यांच्या मोहालीतील कार्यालय आणि चंदीगडमधील सेक्टर ४० येथील निवासस्थानावर छापे टाकले.

छाप्यादरम्यान, डीआयजी भुल्लर (Harcharan Singh Bhullar) यांच्या घरातून जे काही सापडले ते पाहून सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले. त्यांच्या घरातून तीन बॅगा आणि दोन ब्रीफकेसमध्ये भरलेली तब्बल ७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी होती की, ती मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजणारी तीन मशीन्स मागवावी लागली. याशिवाय, घरातून दीड किलो सोन्याचे दागिने, महागडी घड्याळे, विदेशी दारू आणि एक रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले.

Harcharan Singh Bhullar | आलिशान गाड्या आणि १५ मालमत्तांची कागदपत्रे :

अधिकाऱ्यांना छाप्यादरम्यान भुल्लर यांच्या नावावर असलेल्या १५ मालमत्तांची आणि बीएमडब्ल्यू (BMW) व मर्सिडीज (Mercedes) सारख्या आलिशान गाड्यांची कागदपत्रेही सापडली. हरचरण भुल्लर हे २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांचे वडील महाल सिंग भुल्लर हे पंजाबचे माजी डीजीपी होते. भुल्लर यांचा मूळ पगार भत्त्यांसहित दरमहा २ लाख १६ हजार ६०० रुपये आहे, मात्र त्यांनी तब्बल १५ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे, ज्यात जालंधरमधील फार्महाऊस आणि चंदीगड व कपूरथळा येथील जमिनीचा समावेश आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डीआयजी भुल्लर यांनी लाचेच्या पैशांचा हिशोब ठेवण्यासाठी एक डायरी ठेवली होती, ज्यामध्ये कोणाकडून किती पैसे घेतले आणि ते कुठे वाटले याची सविस्तर नोंद होती. सीबीआय सध्या ही डायरी शोधत असून, या प्रकरणात आणखी काही मोठे अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News title : Punjab DIG’s Home Raided, Crores Seized

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now