राज्यातील वातावरणात मोठा बदल; पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसाठी IMD चा इशारा

On: January 19, 2025 2:13 PM
Pune Weather
---Advertisement---

Pune Weather | राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच स्थिती असून, गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर ओसरला (Receded) आहे. परंतु, आता पुन्हा एकदा वातावरणात (Atmosphere) बदल जाणवत आहेत. पुणे वगळता इतर सर्व जिल्ह्यांत आकाश निरभ्र (Clear Sky) राहणार असून कोरडे हवामान राहील. तर, पुण्यात पुन्हा गारठा (Cold) वाढणार आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती काय राहील, जाणून घेऊया.

पुण्यात धुक्यासह ढगाळ आकाश

१९ जानेवारीला पुण्यामध्ये धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान (Maximum Temperature) ३० अंश सेल्सिअस (Degree Celsius) तर किमान तापमान (Minimum Temperature) १३ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे पुणेकरांना हलकी थंडी (Slight Cold) जाणवण्याची शक्यता आहे.

साताऱ्यात निरभ्र आकाश

साताऱ्यातील कमाल तापमान आज ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यात निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत साताऱ्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे.

सांगलीतही निरभ्र आकाश

सांगलीत १९ जानेवारीला निरभ्र आकाश असणार आहे. सांगलीतील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सांगलीच्या किमान तापमानात वाढ (Increase) होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सोलापुरात उकाडा

सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये १९ जानेवारीला आकाश निरभ्र असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शहरांच्या तुलनेत सोलापूरमधील कमाल तापमान जास्त असल्याने त्या ठिकाणी उकाडा जाणवत आहे.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now