Pune Metro l पुणे (Pune) शहर, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि जिल्ह्याचा एकत्रित विकास साधण्यासाठी पुढील ३० वर्षांकरिता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात मेट्रो (Metro) आणि बीआरटी (BRT) सेवेचा विस्तार करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) (DPC) बैठकीत हा आराखडा सादर करण्यात आला.
एक लाख २६ हजार ४८९ कोटी रुपयांच्या या आराखड्याची अंमलबजावणी तीन टप्प्यांत केली जाणार आहे. ‘महामेट्रो’चे (Mahametro) व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण केले.
Pune Metro l २७६ किलोमीटरचे ‘मेट्रोमार्ग’ उभारणार :
या आराखड्यानुसार पुढील ३० वर्षांत २७६ किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय, सहा नवीन जलद बस वाहतूक अर्थात बीआरटी (BRT) मार्ग प्रस्तावित आहेत. या अंतर्गत, दोन मेट्रोमार्गांचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे (Central Government) पाठविण्यात आले आहेत. यामध्ये, वनाझ ते चांदणी चौक (Vanaz to Chandni Chowk) आणि रामवाडी ते वाघोली (Ramwadi to Wagholi) या मार्गांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, जिल्हा न्यायालय ते शेवाळेवाडी (Shewalewadi), विद्यापीठ चौक (Vidyapith Chowk) ते देहूरोड (Dehuroad), खराडी (Kharadi) ते खडकवासला (Khadakwasla), निगडी (Nigdi) ते चाकण (Chakan), हडपसर (Hadapsar) ते सासवड रस्ता (Saswad Road), हडपसर ते लोणी काळभोर (Loni Kalbhor) असे एकूण १४८ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर, जिल्हा न्यायालय ते आळंदी (Alandi), वाकड चौक (Wakad Chowk) ते शेवाळेवाडी, ‘एचसीटीएमआर’ (HCTMR) ते पीएमसी (PMC), ‘एचसीटीएमआर’ ते पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) असे १२८ किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग प्रस्तावित आहेत.
सहा नवीन ‘बीआरटी’ मार्गांचा प्रस्ताव :
‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’च्या (पीएमआरडीए) (PMRDA) हद्दीत सहा नवीन ‘बीआरटी’ मार्ग पुन्हा प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये, रावेत (Ravet) ते राजगुरुनगर (Rajgurunagar), गवळी माथा चौक (Gavali Matha Chowk) ते शेवाळेवाडी, रावेत ते तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade), चांदणी चौक ते हिंजवडी (Hinjewadi) असे एकूण ११७ किलोमीटर लांबीच्या मार्गांचा समावेश आहे. याशिवाय, लोणी काळभोर ते केडगाव (Kedgaon), भूमकर चौक (Bhumkar Chowk) ते चिंचवड चौक (Chinchwad Chowk) हे ४६ किलोमीटर लांबीचे मार्ग देखील प्रस्तावित आहेत.
सध्याच्या घडीला, पीएमपी (PMP) प्रवासी बस सेवेचा वापर अवघा १० टक्के इतकाच होत आहे. हा टक्का वाढवून तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी, पीएमपीला (PMP) सहा हजार बसची आवश्यकता भासणार आहे. सन २०५४ पर्यंत बसची संख्या ११,५६४ पर्यंत वाढवावी लागणार आहे. याशिवाय, पीएमपीचे (PMP) ६४१ किलोमीटरचे १८ नवे बस मार्ग प्रस्तावित असून, १० नवीन बस टर्मिनल (Bus Terminal) उभारावे लागणार आहेत.
आमदार सुनील शेळके (Sunil Shelke), राहुल कुल (Rahul Kul) यांची ‘डीपीसी’वर वर्णी :
महायुतीचे (Mahayuti) सरकार सत्तेत आल्यानंतर ‘डीपीसी’वरील (DPC) पूर्वीच्या सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. नुकतीच, सरकारने पुणे जिल्ह्यासाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके आणि भाजपचे (BJP) दौंडचे (Daund) आमदार राहुल कुल यांची नियुक्ती केली आहे.






