पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘हा’ पूल दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार

On: April 18, 2025 3:58 PM
Thane Traffic Diversion
---Advertisement---

Pune News | पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला भिडे पूल (Bhide Bridge) अचानकपणे बंद करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या (Pune Metro) डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) स्टेशनजवळील पादचारी पुलाच्या कामामुळे हा पूल पुढील दीड महिन्यांसाठी वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल

पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळ पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल तब्बल दीड महिने बंद राहणार असल्याने, या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

कुठलीही पूर्वसूचना न देता हा पूल अचानक बंद केल्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. मेट्रो प्रशासनाने कामामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमस्व असल्याची पाटी पुलाजवळ लावली आहे. वाहतूक विभागातर्फे लवकरच पर्यायी मार्ग जाहीर केले जातील असे अपेक्षित आहे.

Pune News | महत्त्वाचा पूल बंद

बाबा भिडे पूल हा मुठा नदीवर (Mutha River) असून, शहराच्या मध्यवर्ती भागांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. नारायण पेठ (Narayan Peth), सदाशिव पेठ (Sadashiv Peth) यांसारख्या पेठांमधून तसेच उपनगरांतून जे. एम. रोड (JM Road), एफ. सी. रोड (FC Road) यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक याच पुलाचा वापर करतात.

हा पूल बंद झाल्याने नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतुकीवरही मोठा ताण येणार आहे. हा भाग नेहमीच रहदारीचा असल्याने, येथील वाहतूक कोंडी कमी करण्याचे आणि पर्यायी मार्गांचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान पुणे शहर वाहतूक शाखेसमोर (Pune City Traffic Police) उभे राहिले आहे.

Pune’s Bhide Bridge Closed 1.5 Months for Metro Work

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now