Pune Crime l पुणे शहरात अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून घडली घटना :
पुण्यातील येरवडा परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये संबंधित ठेकेदार हा प्रचंड जखमी झाला आहे. तर या घटनेनंतर एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचा तपस पोलीस तपास करत आहेत.
या घटनेमध्ये रितेश परदेशी असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते पुण्याच्या येरवडा येथील जयजवान नगर परिसरात राहत आहेत. तसेच ते ठेकेदारीचं काम करतात. तसेच उमेश वाघमारे असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे.
Pune Crime l नेमकं काय घडलं? :
सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रितेश परदेशी आपल्या दुचाकीने येरवड्यातील जयजवान नगर परिसरातून जात होते. मात्र यावेळी तिथे उमेश वाघमारे आला. त्यावेळी त्याने कपड्यांमध्ये कुऱ्हाड लपवली होती. हल्ला करण्यापूर्वी त्याने परदेशी यांना थांबवलं आणि अचानक कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करायला सुरुवात केली.
पण रितेश परदेशी यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीचा वार आपल्या हातावर झेलला. तसेच हल्ला झाल्यानंतर ते दुचाकीसह खाली पडले. मात्र यानंतर आरोपी उमेश वाघमारेने परदेशी यांच्यावर एकपाठोपाठ एक वार केले. मात्र भररस्त्यात हा हल्ला झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. लोकांना पाहून आरोपी उमेश वाघमारे घटनास्थळावरून फरार झाला. तसेच नागरिकांनी तातडीने परदेशी यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी रितेश परदेशी आणि हल्लेखोर उमेश वाघमारे एकमेकांना चांगले ओळखतात. पण परदेशी यांचे उमेश वाघमारे यांच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय उमेश वाघमारेला होता. मात्र यातूनच त्याने परदेशी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
News Title : pune yerwada contractor attack
महत्वाच्या बातम्या –
जानेवारीत तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार; पाहा सुट्ट्यांची यादी
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर!
आज ‘या’ 6 राशीच्या व्यक्ती मालामाल होणार!
बीडमध्ये पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, अखेर त्याला उचललं!
पुणेकरांनो….,थर्टीफर्स्टला घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!






