येरवड्यात मध्यरात्री घडलं भयंकर! पोलिसांना वारंवार फोन करूनही मदत उशिरा मिळाली

On: October 16, 2025 1:58 PM
Navi Mumbai Crime
---Advertisement---

Pune Yerawada Crime | पुण्यातील येरवडा परिसरात मध्यरात्री भीषण हाणामारी झाली आहे. लक्ष्मीनगर आर.के. चौकात दोन गटांमध्ये उघडपणे झालेल्या दगडफेकी आणि कोयत्यांच्या हाणामारीने परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचं सावट पसरलं आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला असून नागरिकांनी पोलिस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादानं उघडपणे दगडफेक आणि हाणामारीचं रूप घेतलं. काहीजणांनी हवेत कोयते फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना वारंवार कॉल केले, मात्र पोलीस मदत उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. (Pune Yerawada Crime)

वारंवार कॉल करूनही पोलिस मदत उशिरा :

या घटनेचा CCTV Video आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात काही युवक उघडपणे कोयत्यांसह फिरताना आणि एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. नागरिकांनी वारंवार पोलिसांना संपर्क साधून मदतीची विनंती केली, तरी पोलिस पथक उशिरा पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे येरवडा परिसरात प्रचंड रोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलीकडेच याच भागात घरात घुसून दामपत्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा गोंधळ घडल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. मुलांना बाहेर पाठवण्यास पालक घाबरत असून रात्री नागरिक रस्त्यावर उतरणं टाळत आहेत. (Pune Yerawada Rada Video)

Pune Yerawada Crime | पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया :

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी टोळ्यांविरोधात मोठी कारवाई सुरू करण्याची घोषणा केली होती. “फक्त व्यक्तींना अटक करणे हे उद्दिष्ट नसून त्यांच्या संपूर्ण ‘इकोसिस्टम’चा नायनाट करणे हे आमचं ध्येय आहे,” असं ते म्हणाले होते. (Pune Yerawada Rada Video)

कायद्याच्या विरोधात चालणाऱ्यांना इशारा देताना त्यांनी सांगितलं होतं की, “शहरात कायद्याचा आणि शांततेचा भंग करणाऱ्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी नियमात राहावं, अन्यथा आमची काठी आहेच.” मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

News Title: Pune Yerawada Clash: Violent Fight with Koyta Caught on CCTV, Locals Angry as Police Arrived Late

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now