मोठी बातमी! पुण्यातील धबधबे ‘या’ तारखेपर्यंत पर्यटकांसाठी बंद

Pune News l नागरिक पावसाळ्यात मनसोक्त फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र पावसाळ्यात अनेक दुर्घटना देखील घडत असतात. अशातच गेल्या दोन दिवसांपूर्वी लोणावळा येथील भुशी डॅम आणि ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांसाठी बंद :

प्रशासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार, पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. लोणावळा आणि ताम्हिणी येथील या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. दिवसेंदिवस पाऊसाचे प्रमाण वाढत चालले असल्याने पाण्याच्या प्रवाहात देखील वाढ होत आहे. मात्र वाढत्या प्रवाहामुळे खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात देखील होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे भीमाशंकर अभयारण्यातील सर्व निसर्गवाटा देखील 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे विकेंडला पावसाची मजा लुटण्यासाठी पुणे परिसरातील धबधबे आणि पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार असल्याचं दिसून येत आहे.

Pune News l पुण्यातील कोणकोणती पर्यटनस्थळं बंद राहणार? :

1) भीमाशंकर येथील सर्व धबधबे पर्यटकांसाठी बंद राहणार.

2) कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद राहणार.

3) घोंगळ घाट नाला, खांडस ते भीमाशंकर मार्ग प्रवासासाठी बंद राहणार.

4) शिडी घाट पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद राहणार.

5) चोंडीचा धबधबा बंद राहणार.

लोणावळ्यात संचारबंदी लागू :

लोणावळा येथील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याची घटना घडली आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला कठोर आदेश दिले होते. तसेच संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिला आहे.

News Title – Pune waterfalls closed for tourists, no-entry till September 30

महत्त्वाच्या बातम्या-