पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

On: December 10, 2024 12:22 PM
Pune Water Cut
---Advertisement---

Pune News l पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता पुणे शहरातील नागरिकांना एक दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण पुण्यात येत्या गुरुवारी म्हणजेच 12 डिसेंबरला संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय शुक्रवारी म्हणजेच 13 डिसेंबरला देखील शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार :

कारण 12 डिसेंबरला जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, पर्वती एमएलआर टाकी परिसर, भामा आसखेड, टैंकर पॉईट, लष्कर जलकेंद्र यासह आदी पाणीपुरवठा केंद्रांतून जलवाहिनीमधून होणारी पाण्याची गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे.

याशिवाय शुक्रवारी म्हणजेच 13 डिसेंबरला पूर्ण दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Pune News l कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार :

पर्वती नवे व जुने जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत एमएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, पर्वती एचएलआर, पर्वती टँकर पॉइंट, चांदणी चौक टाकी परिसर, नवे व जुने होळकर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी व एचएलआर परिसर, चतुःशृंगी टाकी, एसएनडीटी एमएलआर, कोंढवे धावडे टाकी व त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे.

याशिवाय गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली आहे.

News Title : Pune Water Supply Will Be Shut Down On Thursday 12 Dec

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण, नंतर हत्या! नेमकं काय घडलं

कुर्ला अपघातातील चालकाबाबत धक्कादायक खुलासा समोर!

ब्रेक फेल की… कुर्ल्यातील अपघातामागचं खरं कारण काय?

राजकीय वर्तुळात शोक, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं निधन

“लाडक्या तायांनो, आता रस्त्यावर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून स्वतःचं रक्षण…”; किरण माने यांची पोस्ट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now