पुणेकरांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

On: October 29, 2025 6:20 PM
Pune Water Cut
---Advertisement---

Pune Water Cut | पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (30 ऑक्टोबर) पुणे महानगरपालिकेच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्येही पाण्याचा पुरवठा थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ही बंदी पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राला जोडलेल्या मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्तीच्या कामासाठी करण्यात आली आहे. हे काम गुरुवारी दिवसभर सुरू राहणार असून, काही भागांमध्ये शुक्रवारी सकाळपर्यंतही पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद :

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्ता, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, महंमदवाडी रस्ता, फुरसुंगी, उरूळी देवाची आणि भेकराईनगर या भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील.

तसेच खराडी परिसरातील आपले घर, भानगाई वस्ती, चंदननगर, बोराटेनगर, वडगाव शेरी, गणेशनगर, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीरनगर, शेजवळ पार्क, साईनाथनगर, वाढेश्वरनगर, घरकुल सोसायटी आणि टेम्पो चौक परिसरातही पाणी येणार नाही. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा सल्ला दिला आहे.

Pune Water Cut | पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठीही महत्त्वाची सूचना :

निगडीतील भक्ती शक्ती चौक परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाशी संबंधित जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कारणामुळे नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, वल्लभनगर, फुगेवाडी, कासारवाडी, तसेच चिखलीतील हरगुडे वस्ती, पवार वस्ती आणि जाधववाडी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले की, “निगडी परिसरातील मेट्रो कामाशी संबंधित जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी सहकार्य करून पाण्याचा वापर संयमाने करावा.”

News Title: Pune Water Cut Tomorrow: Major Areas in Pune and PCMC to Face Water Supply Disruption on October 30

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now