Pune Water Cut | पुणे शहरात एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे नागरिकांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीची दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे गुरुवार, 21 ऑगस्ट 2025 रोजी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (Pune Water Cut)
प्रादेशिक हवामान विभागाने पुण्यासह रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच आता पाणीकपातीमुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागणार आहे.
कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद? :
येरवडा विभाग : येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, कलवड, फुलेनगर, साप्रस वसाहत, शांतीनगर, प्रतीकनगर, कस्तुरबा वसाहत, नागपूर चाळ, येरवडा कारागृह वसाहत, प्रेस कॉलनी. (Pune Water Cut)
वडगावशेरी विभाग : वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, कल्याणीनगर.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. (Pune Water Cut)
Pune Water Cut | शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा :
महापालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्यामुळे शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येईल. त्यामुळे नागरिकांनी पुढील दोन दिवस पाण्याचा वापर जपून करावा, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.






