पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

On: October 28, 2025 11:57 AM
Thane water cut
---Advertisement---

Pune News | पुणे (Pune) शहरातील अनेक भागांमध्ये गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा (Pune Water Cut) बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्रातून (Parvati Water Works) लष्कर पाणीपुरवठा केंद्राला (Lashkar Water Works) पाणी पुरवणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तसेच भामा आसखेड योजनेतील (Bhama Askhed Project) जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही जलकेंद्रांवरून होणारा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहील.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग:

लष्कर जलकेंद्र भाग: सोलापूर रस्ता परिसर, हडपसर गावठाण, मातवबाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोडची डावी बाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरियंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्त्याचा उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची (संपूर्ण), भेकराई नगर, मंतरवाडी, बेकर हिल टाकी परिसर (कोंढवा खुर्द, वानवडी). (या भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा देखील बंद राहील).

भामा आसखेड योजना भाग: शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाडेश्वर नगर, मारुती नगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटे नगर, विद्या नगर, मुरलीधर सोसायटी.

Pune News | पाण्याचा जपून वापर करा :

पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा खंडित राहील आणि शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी गुरुवारी लागणारे पाणी आदल्या दिवशीच साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

News title : Pune water cut news

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now